
Hazoor Share Price | मागील काही वर्षांत हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 38,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या संयमी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे.
हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवरून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 400.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
29 मार्च 2019 रोजी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 5 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 381 पट वाढले आहेत. ज्या लोकांनी 2019 मध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.81 कोटी रुपये झाले आहे.
मागील काही दिवसापासून हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 190 टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.