9 May 2025 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO
x

Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 72% स्वतः झाला, आता दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी, नेमकं काय चाललंय?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | 2021 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 या वर्षात शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अवघ्या एका वर्गात या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 72.74 टक्के नुकसान केले आहे. 2021 या वर्षात कंपनीच्या शेअरने लोकांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. त्याच वेळी 2022 या वर्षात हा स्टॉक इतका कोसळला की त्याची नोंद अक्षरशः भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झाली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के कमजोरीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)

एका वर्षात शेअर्स 72 टक्के पडला :
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 72 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांवरून पडून 27 रुपयांवर आली आहे. स्टॉकमध्ये कमजोरी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी धोकादायक आणि जोखमीचे आहेत, अशी चिंता स्टॉक मार्केट नियामक सेबीने व्यक्त केली होती. तेव्हा पासून या स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड होत आहे.

भारतीय स्टॉक मार्केट नियामक सेबीने मागील वर्षी ब्राइटकॉम कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी ‘Deloitte Touche Tohmatsu India LLP’ या फर्मची नियुक्ती केली आहे. स्टॉक मार्केट नियामक सेबीने सर्व प्रकरणात वेगाने हालचाल करणे आणि स्वतःची तपास यंत्रणा मजबूत करणे खूप गरजेचे आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

शंकर शर्मा यांची गुंतवणूक :
जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीमधील ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.50 कोटी शेअर्स आहेत. शंकर शर्मा यांनी कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.24 टक्के शेअर्स भाग भांडवल होल्ड केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price 532368 BCG stock market live on 24 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या