12 December 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Bank of Maharashtra | बँक FD करणाऱ्यांसाठी महत्वाचा अलर्ट! अचानक FD रद्द केल्यास 'हा' नवा नियम लागू, फायदा की नुकसान?

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेत FD करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच SBI आणि इतर सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक FD ग्राहकवर्ग आहे. आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी काही पर्याय खूप जोखमीचे आहेत, तर काही पर्यायांमध्ये जोखीम नाही. जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायात एफडीचाही समावेश होतो.

आरबीआयकडून घोषणा – महत्त्वाची सुविधाही दिली जाणार
एफडी अंतर्गत लोकांना ठराविक व्याजदर दिला जातो. त्याचबरोबर एफडीसंदर्भात आरबीआयकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या माध्यमातून लोकांना एक महत्त्वाची सुविधाही दिली जाणार आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल…

मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे की, बँकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कोणत्याही रकमेच्या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा द्यावी लागेल. सध्या ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत आहे. RBI बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की, आढावा घेतल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, पैसे न काढता येणाऱ्या एफडीची किमान रक्कम 15 लाख रुपयांवरून 1 कोटी रुपये केली जाऊ शकते. म्हणजेच व्यक्तींच्या माध्यमातून एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

बँक एफडी कालावधीनुसार व्याजदर
यासोबतच मुदतपूर्व पैसे काढण्याच्या पर्यायावर अवलंबून सध्याच्या मानकांनुसार एफडीचा कालावधी आणि आकारानुसार वेगवेगळे व्याजदर देण्याचा पर्यायही बँकांना देण्यात आला आहे. या सूचना सर्व व्यापारी बँका आणि सहकारी बँकांना तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने आणखी एका परिपत्रकात म्हटले आहे की, प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी ‘बल्क डिपॉझिट’ची मर्यादा सध्याच्या १५ लाखरुपयांवरून १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात आली आहे.

दररोज 100 रुपये नुकसान भरपाई
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (सीआयसी) ग्राहकांची क्रेडिट माहिती सुधारण्यास उशीर झाल्यास दररोज 100 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल. पतसंस्था (सीआय) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (सीआयसी) नवीन प्रणाली लागू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra FD RBI Rules alert 27 October 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x