
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 10 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2023 या वर्षात ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स 57 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आता या स्टॉकमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने डॉ . सुरभी सिन्हा यांना नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर या श्रेणीतील अतिरिक्त संचालक पदावर पुनर्नियुक्ती केले आहे. ही माहिती येताच ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत.
BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2 मे 2023 रोजी ब्राइटकॉम कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवी 9.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 मे रोजी स्टॉक पुन्हा अप्पर सर्किटवर लागून 10.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 4 मे 2023 रोजी स्टॉकमध्ये पुन्हा अप्पर सर्किट लागला आणि शेअर 10.72 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर 5 मे रोजी स्टॉक अपर सर्किटसह 11.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार दिनांक 9 मे रोजी देखील ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स अपर सर्किटवी 12.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअर किंमत इतिहास :
मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 30 टक्के घसरले आहेत. मागील 5 ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 23.74 टक्के वाढले आहेत. मागील एक महिन्यात या कंपनीचे शेअर्स 19.10 टक्के कमजोर झाले आहेत. आणि सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 63.33 टक्के कमजोर झाले आहेत. ब्राइटकॉम कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी कंपनीचे 2.50 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 72 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 9.35 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.