1 May 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा

Budget 2023 Income Tax

Budget 2023 Income Tax | मोदी सरकारने 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबतही लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये निर्मला सीतारामन यांनी आयकरासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील जनता बऱ्याच काळापासून प्राप्तिकरसवलतीची वाट पाहत होती. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे.

इन्कम टॅक्स
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांच्या फायद्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. प्राप्तिकरासंदर्भात अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, नव्या कर प्रणालीनुसार ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील सवलतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ही सवलत पाच लाख रुपयांपर्यंत मिळत होती. यासोबतच इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता सात लाखांपर्यंत कर लागणार नाही. नोकरदारांना याचा फायदा होईल.

इनकम टॅक्स स्लॅब
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मी 2020 मध्ये 2.5 लाख रुपयांपासून 6 इन्कम स्लॅबसह नवीन वैयक्तिक आयकर प्रणाली सुरू केली. आता मी या प्रणालीतील कर रचनेत बदल करण्याचा, स्लॅबची संख्या 5 पर्यंत कमी करण्याचा आणि कर सवलतीची मर्यादा 3 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवतो.

असा आहे नवा स्लॅब
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “नवीन कर दर 0 ते 3 लाख रुपये – शून्य, 3 ते 6 लाख – 5%, 6 ते 9 लाख – 10%, 9 ते 12 लाख – 15%, 12 ते 15 लाख – 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त – 30% या दराने आकारले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title Budget 2023 Income Tax relief FM Nirmala Sitharaman announcement check details on 01 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Budget 2023 Income Tax(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या