
Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनी शेअर धारकांकडून पुन्हा शेअर खरेदी करणार आहे. टीसीएस कंपनीने नुकताच 17,000 कोटी रुपये मूल्याची बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने 25 नोव्हेंबर हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. TCS Buyback
जेव्हा एखादी कंपनी शेअर धारकांकडून खुल्या बाजारातून स्वतःचे शेअर्स पून्हा खरेदी करते, तेव्हा या प्रक्रियेला बायबॅक असे म्हणतात. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 3,512.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात टीसीएस कंपनीच्या शेअरची किंमत 3.54 टक्के कमजोर झाली आहे. 11 ऑक्टोबर 2023 रोजी टीसीएस कंपनीने आपले 1 दर्शनी मूल्य असलेले 4,09,63,855 पूर्ण पेड इक्विटी शेअर्स 4,150 रुपये प्रति शेअर या किमतीवर बायबॅक करण्याची घोषणा केली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीसीएस कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के वाढीसह 3399 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील सहा वर्षांत टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने केलेला हा पाचवा बायबॅक असेल. टीसीएस कंपनी आपल्या एकूण पेड अप इक्विटी भाग भांडवलाच्या 1.12 टक्के भाग भांडवल बायबॅक करणार आहे. यासाठी कंपनी 4150 रुपये प्रति इक्विटी शेअर किंमत देणार आहे.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत टीसीएस कंपनीने 11,432 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत टीसीएस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8.7 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टीसीएस कंपनीने 11,074 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील सहा महिन्यात टीसीएस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 9.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.