12 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Zen Technologies Share Price | मालामाल शेअर! 1371% परतावा दिल्यानंतर मागील 5 दिवसात झेन टेक्नॉलॉजी शेअरने 34% परतावा दिला

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मजबूत तिमाही निकालानंतर झेन टेक्नॉलॉजीज या ड्रोन निर्माता कंपनीचे शेअर्स अवघ्या एका आठवड्यात 36 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 343 टक्के नफा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 853.85 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 175.15 रुपये होती. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के घसरणीसह 785.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

झेन टेक्नॉलॉजीज ही कंपनी आपल्या ग्राहकांना मुख्यतः संरक्षण प्रशिक्षण सोल्यूशन्स पुरवण्यासोबतच ड्रोन आणि अॅण्टी ड्रोन सोल्यूशन्स प्रदान करण्याचे काम करते. मागील 8 वर्षात झेन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 55.70 रुपयेवरून वाढून 819.50 रुपयेवर पोहोचले आहेत.

झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने मागील 8 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1371 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 882 टक्के वाढले असते. मागील सहा महिन्यांत झेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने लोकांना 288 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी झेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 70.45 टक्के वाढले आहे. मागील पाच दिवसांत झेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीचा मार्च 2023 मधील एबिटा मार्जिन 35.65 टक्क्यांवरून वाढून जून तिकाहित 50.93 टक्केवर पोहचला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 37.80 टक्के नोंदवला गेला होता. जून 2023 तिमाहीत झेन टेक्नॉलॉजीज कंपनीने 47.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीने 8.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आणि कंपनीची विक्री 33.23 कोटींवरून वाढून 132.45 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price today on 12 August 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x