
Canara Bank Share Price Today | 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी मार्च तिमाहीमध्ये ‘कॅनरा बँक’ स्टॉकमध्ये मंदी पाहायला मिळाली होती. असे असूनही शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘रेखा झुनझुनवाला’ यांनी स्टॉक होल्ड करून ठेवले आहेत. ‘रेखा झुनझुनवाला’ यांची कॅनरा बँकेतील शेअर होल्डिंग मार्च 2023 तिमाहीमध्ये स्थिर पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कॅनरा बँकेचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 291.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Canara Bank Limited)
शेअर होल्डर वाटा :
कॅनरा बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे बँकेचे एकूण 3,75,97,600 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 2.07 टक्के आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेचे 2.07 टक्के म्हणजेच 3,75,97,600 शेअर्स धारण केले होते. याचा अर्थ कॅनरा बँकेच्या शेअरच्या किमतीत 13.50 टक्क्यांनी पडझड होऊनही रेखा झुनझुनवाला यांनी स्टॉक होल्ड करून ठेवला आहे.
शेअरची पुढील वाढ :
शेअर बाजारातील तज्ज्ञ कॅनरा बँकेच्या शेअरबाबत सकारात्मक मत व्यक्त करत आहेत. कॅनरा बँकेचे पुढील काळात 310 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअर्सवर ‘बाय’ टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणाले की, पुढील काळात कॅनरा बँकेचे शेअर 300 ते 310 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
एकदा या स्टॉकने क्लोजिंग आधारावर ब्रेकआउट दिला की किंमत 330 रुपये किंमत स्पर्श करू शकते. कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत, यासोबत ऑटो सेगमेंटमध्ये ही मजबूत रिकव्हरी पाहायला मिळू शकते. कॅनरा बँकेच्या वाहन कर्ज वाटपमुळे ऑटो क्षेत्रातील वाढीचा आणि विक्रीचा फायदा कॅनरा बँकेला होऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.