
Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल कॅपिटल या NBFC कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 रुपयेच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 741.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कॅपरी ग्लोबल कॅपिटल कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 हजारांच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. 21 जून 2007 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे शेअर्स 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 741.90 रुपयेवर पोहचला आहे. मागील 16 वर्षांत कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 64413 टक्के मजबूत झाले आहेत.
27 मार्च 2023 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 565.85 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील अडीच महिन्यांत कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 54 टक्क्यांनी वाढून 15 जून 2023 रोजी 874 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मात्र आता या शेअरमध्ये उच्चांक किंमत पातळीपासून 15 टक्के घसरण झाली आहे.
कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीने 2023 या आर्थिक वर्षासाठी तयार केलेली रणनीती फायदेशीर ठरली आहे 2022-23 मध्ये या MSME, सोने आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्ताचा वाटा वार्षिक आधारावर 74 टक्के वरून वाढून 79 टक्क्यांवर पोहचला आहे.
या कंपनीचा बांधकाम वित्तपुरवठा 19 टक्क्यांवरून वाढून 18 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीच्या कार लोन व्यवसायाने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 6000 कोटी रुपयांचे कार कर्ज वितरित करून आपल्या शाखा देखील वाढवल्या आहेत.
पुढील काळात कॅप्री ग्लोबल कॅपिटल या NBFC कंपनीची नेट इंटरेस्ट मार्जिन सुधारण्याची किंवा स्थिर होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी सर्व सकारात्मक गोष्टी कव्हर केल्या आहेत, या मुळे स्टॉक पुढील काळात वाढण्याची शक्यता कमी आहे. म्हणून तज्ञांनी कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत कमी करून 695 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.