1 May 2025 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

CESC Share Price | 3 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना दिला 4600% परतावा, काही हजारांचे झाले करोड रुपये

CESC Share Price

CESC Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 496 अंकांच्या घसरणीसह 71656 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 134 अंकांच्या घसरणीसह 21796 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारात मंदी असताना देखील सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सीईएससी लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 149.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 62 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18530 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.70 टक्के घसरणीसह 135 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.

28 मार्च 2023 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 63 रुपये या नीचांक किमतीवरून 100 टक्क्यांनी वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर 39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 300 टक्क्यांनी वाढले झाले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4600 टक्के वाढले आहे.

सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना तीन टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 78 रुपये या नीचांक किमतीवरून 80 टक्के वाढली आहे.

नुकताच सीईएससी लिमिटेड कंपनीने 150 MW पवन क्षमतेचा प्रकल्प उभारणीसाठी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली आहे. ही कंपनी भारतातील पहिली इंटिग्रेटेड इलेक्ट्रिकल युटिलिटी कंपनी आहे. सीईएससी लिमिटेड कंपनी 1899 पासून कोलकाता आणि हावडा या शहरात वीज निर्मिती आणि वितरण व्यवसाय करत आहे. ही कंपनी सध्या तीन औष्णिक वीज प्रकल्प आणि स्वतःची पारेषण व वितरण व्यवस्था हाताळत आहे. ही कंपनी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना वीज पुरवठा करते.

सीईएससी लिमिटेड कंपनी मुख्यतः नवीकरणीय उर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीने गुजरात सोलर, हायड्रो पॉवर व्हेंचर्स आणि विंड पॉवर ऑपरेशन्समध्ये देखील आपला सहभाग नोंदवला आहे. या कंपनीने नुकताच 1500 मेगावॅट पवन ऊर्जा क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी आयनॉक्स विंड कंपनीसोबत करार संपन्न केला आहे. या करारांतर्गत पुढील तीन ते चार वर्षांत 1500 मेगावॅट क्षमतेचे विंड जनरेटर उभारण्यात येणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CESC Share Price NSE Live 09 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CESC Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या