27 November 2022 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

CIBIL Score | खराब क्रेडिट स्कोअर असल्यामुळे कर्ज मिळत नाही?, तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा

CIBIL Score

CIBIL Score | आजकाल क्रेडिट कार्ड वापरणे ही काळाची गरज बनली आहे. जर तुम्हीही क्रेडिट कार्डचा वापर करत आणि पेमेंट वेळेवर करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला होऊ शकतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर फक्त कर्ज सहज मिळणार नाही तर कमी व्याजदरात बँका तुम्हाला कर्ज देतील. कोणतीही बँक खराब किंवा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज देण्याच्या आधी विचार करेल आणि सहसा कर्ज नाकारू ही शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत जरी बँकेने कर्ज दिले तर त्यावर बँक जास्त व्याजदर आकारेल. साधारणपणे 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांनी क्रेडिट स्कोअर चांगला करण्यासाठी त्यांच्या कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत. क्रेडिट स्कोअर हे एका रात्रीत चांगले करता येत नाही. जर तुमचा क्रेडिट स्कोर खूप कमी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वाढवू शकता, आणि सुधारू शकता.

कर्जाचे ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा :
जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय कंपनी तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना करते तेव्हा ते सर्वप्रथम तुमच्या क्रेडिट कार्ड आणि EMI पेमेंटचा पॅटर्न तपासतात. म्हणूनच क्रेडिट कार्डचे बिल किंवा EMI नेहमी वेळेवर भरले पाहिजे. यासाठी तुम्ही प्रत्येक बिलाच्या तारखेसाठी एक लक्षात राहील अशी तारीख ठरवू शकता, जेणेकरून तुम्ही बिलाची तारीख विसरणार नाही. यासह, क्रेडिट कार्डची किमान देय रक्कम भरण्याऐवजी, तुम्ही एकाच वेळी थकबाकीची संपूर्ण रक्कम पूर्ण भरली पाहिजे. जर तुम्ही फक्त किमान देय रक्कम भरत असाल तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. तसेच, काही वेळा क्रेडिट कार्ड कंपन्या लोकांकडून थकीत रकमेवर जास्त व्याज शुल्क चार्ज करतात.

अर्ज करताना अनावश्यक गोष्टी टाळा :
जेव्हा तुम्ही बँकेत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायला जाता, तेव्हा बँका किंवा वित्त कंपन्या अर्जात तुमच्याकडून अनेक गोष्टींची माहिती घेतात. काहीवेळा असे अनावश्यक प्रश्न विचारलेले जातात ज्याचे उत्तर आपण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या बँकेत एकाच वेळी कर्जासाठी अर्ज करणे टाळावे. तसेच, क्रेडिट कार्ड किंवा बँक किंवा फायनान्स कंपनीकडे कर्जासाठी थेट अर्ज करण्याऐवजी,आधी ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत की नाही हे जाणून घ्या.

भागीदारीत घेतलेल्या कर्जाची माहिती ठेवा :
जेव्हा इतर व्यक्तीसोबत भागीदारीत कर्ज घेता, त्यावेळी तुम्ही कर्जाचे हफ्ते भरले आहेत की नाही हे तपासले पाहिजे. जर तुम्ही किंवा तुमचा भागीदार कर्जाचा हप्ता भरण्यास विसरलात तर याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही इतर व्यक्तीसोबत भागीदारीत कर्ज घेत असाल तर कर्जाचा EMI वेळेवर भरा आणि भागीदार EMI चुकवणार नाही याची देखील काळजी घ्या.

क्रेडिट लिमिट चे भान ठेवा : क्रेडिट कार्ड वापरताना, नेहमी तुमच्या क्रेडिट लिमिटचे भान ठेवा. क्रीडा कार्डच्या कमाल मर्यादेपर्यंत कर्ज घेऊ नका. कारण असे केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. आणि तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता. एकाच वेळी तुम्हाला एवढे कर्ज परतफेड करणे अवघड होऊ शकते.

डीपीडी बंद करा, डेबिट सेटलमेंटसाठी जाऊ नका :
काहीवेळा तुमच्या कडून जी पेमेंट चुकते, ती तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटच्या ‘डेज पोस्ट पेमेंट’ वर दिसून येते. त्यामुळे, तुमच्याकडे एक किंवा अधिक कार्ड्सवर DPD सेवा सुरू असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डची थकबाकीची रक्कम त्वरित भरली पाहिजे आणि पेमेंट वेळेवर केले आहे की नाही याची शहानिशा केली पाहिजे. जर तुम्ही संपूर्ण देय रक्कम भरू शकत नसाल, तर अश्या वेळी क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला One Time Settlement ऑफर देईल. या ऑफरमध्ये तुम्हाला थकित रकमेचा काही भाग माफ करून उर्वरित भाग भरायला सांगितला जाऊ शकतो. साधारणपणे सर्वजण जे क्रेडिट कार्डची पेमेंट करू शकत नाही ते One Time Settlement ऑफरचा पर्याय निवडतात. पण हा पर्याय निवडल्याने तुम्ही संपूर्ण थकबाकीची रक्कम भरण्यास असमर्थ आहेत असे तुम्ही मान्य करता, ही माहिती क्रेडिट card कंपनी क्रेडिट ब्युरोला देते, आणि याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही पडतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| CIBIL Score improvement strategy and tips and Credit card use benefits on 28 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x