10 June 2023 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

चीनबरोबर संबंध सुधारत असल्याने चीन कंपन्यांबरोबरच्या करारांना अडथळा नाही

China MoU agreement, Industrial Minister Subhash Desai

मुंबई, २४ जून : चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं होतं. हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली होती.

चीन कंपन्यांचे करार रद्द केलेले नव्हते, ते जैसे थे ठेवले होते, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, चीनबरोबर जे संबंध आहेत ते सुधारत असल्याची माहिती आजच आम्हाला मिळाली. त्यामुळे चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना अडथळा येणार नाही. चीनच्या कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्र सरकारने आम्हाला थांबू नका, असे सांगितले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्याने काही अडचण येईल असे वाटत नाही, असे देसाई म्हणाले.

तत्पूर्वी अनेक प्रसार माध्यमांनी ठाकरे सरकारचा चीनला दणका शीर्षकाने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित करार थेट रद्द करण्यात आल्याचं म्हटलं. मात्र महाराष्ट्र नामाच्या टीमला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर सदर वृत्त केवळ स्थगिती संबंधित असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याला राज्य सरकारकडूनच अधिकृत दुजोरा मिळाला होता. राज्यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीच्या असल्याने असे भावनिक निर्णय परवडणारे नाहीत हे देखील वास्तव अर्थ तज्ज्ञांनी बोलून दाखवलं होतं.

 

News English Summary: The agreements of the Chinese companies were not canceled, they were kept as they were,” said Industry Minister Subhash Desai. Therefore, agreements with Chinese companies will not be hampered.

News English Title: China company MoU agreement no longer an obstacle said State Industrial Minister Subhash Desai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SubhashDesai(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x