14 December 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

IFCI Share Price | 9 रुपयांचा शेअर तेजीत पैसा देतोय, 5 दिवसात 40 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 10 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 61 रुपये किमतीच्या पार गेला आहे. जर तुम्ही 28 मार्च 2023 रोजी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 678333 रुपये झाले असते. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये सातपट वाढ पाहायला मिळाली आहे.

मागील पाच दिवसांत आयएफसीआय कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 1.80 टक्के वाढीसह 62.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील पाच दिवसात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने तब्बल 3 वेळा 10 टक्के अप्पर सर्किट हीट केला आहे. आज देखील या शेअरमध्ये गुंतवणुकदार मजबूत खरेदी करत आहेत. आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 63.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9 रुपये होती.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे पाच पट अधिक वाढवले आहेत. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.84 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 384 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन दिवसांत आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील सात दिवसांत या कंपनीचे शेअर्स 52 टक्के आणि 15 दिवसांत 104 टक्के मजबूत झाले आहेत. आयएफसीआय कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,19,909.26 लाख रुपये आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 593 टक्के आणि पाच वर्षांत 348 टक्के वाढली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयएफसीआय कंपनीचे 2.08 टक्के भाग भांडवल धारण केले होते. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील आयएफसीआय कंपनीमधील आपली शेअर होल्डिंग 1.97 वरून 1.98 टक्के वाढवली आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे 25.62 टक्के भाग भांडवल आहे. तर प्रवर्तकांनी या कंपनीचे 70.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 01 February 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x