27 April 2024 9:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

TTML Share Price | मल्टिबॅगर टीटीएमएल शेअर सेबीच्या निरीक्षण कक्षेत आले, शेअरवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या डिटेल्स

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरमधील तेजिमध्ये खंड पडला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 77.68 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.65 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (TTML Share Price Today)

वेगाने परतावा मिळतोय

मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरने लोकांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 15 दिवसांच्या कालावधीत या स्टॉकने 20 टक्के वाढ नोंदवली आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.29 टक्के घसरणीसह 73.45 रुपये किमतीवर ट्रेड (TTML Share Price NSE) करत आहेत. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 149 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 49.65 रुपये होती. (TTML Share Price BSE)

शेअर अतिरिक्त मॉनिटरिंग अंतर्गत देखरेखीखाली

सेबीने टीटीएमएल कंपनीच्या शेअरला अतिरिक्त मॉनिटरिंग अंतर्गत देखरेखीखाली ठेवले आहे. जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये अचानक मोठे चढ पाहायला मिळतात, तेव्हा सेबी असे स्टॉक आपल्या निरीक्षण कक्षेत ठेवते. असे करण्याचा उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास टिकुन रहावा आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून सेबी असे पाऊल उचलते.

जेव्हा एखादा स्टॉक ASM फ्रेमवर्कमध्ये ठेवला जातो, तेव्हा कंपनीचे कामकाज आणि कॉर्पोरेट किर्या यावर कोणताही परिणाम होत नाही. बोनस, लाभांश, स्टॉक स्प्लिट इत्यादी सर्व कॉर्पोरेट कृती सुरळीत चालतात.

टीटीएमएल कंपनीच्या स्टॉकमधील प्रचंड चढ उतार पाहून 13 जून 2023 रोजी सेबीने कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. यावर कंपनीने सांगितले की, आम्ही नेहमी सेबीला कोऑपरेट केले आहे. आणि आम्ही सर्व प्रकारच्या व्यवहाराची माहिती वेळोवेळी सेबीला पुरवली आहे. कंपनीमध्ये कोणताही नवीन कार्यक्रम किंवा माहिती आल्यावर सेबीला दिली जाईल.

टीटीएमएल कंपनीने मार्च 2023 या कालावधीत 280 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी कंपनीला 277 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीमे 1,106.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि त्यात कंपनीला 1144 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 20 June 2023

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x