
CNI Research Share Price | सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयेपेक्षा कमी आहे. सध्याच्या महागाईच्या काळात 5 रुपयेमध्ये चॉकलेट सुध्दा मिळत नाही. मात्र शेअर बाजारात भरघोस परतावा कमावून देणारे स्वस्त शेअर्स सहज मिळतात. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएनआय रिसर्च लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.96 टक्के वाढीसह 3.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.61 रुपये किमतीवर पोहचली होती.
एप्रिल 2023 मध्ये सीएनआय रिसर्च कंपनीचे शेअर्स 1.61 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सीएनआय रिसर्च स्टॉक 19.76 टक्के वाढीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील सहा महिन्यांच्या सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के वाढली आहे. तर मागील पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सीएनआय रिसर्च स्टॉक खरेदी करून 36 टक्के नफा कमावला आहे. YTD आधारे सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सीएनआय रिसर्च कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 37.11 टक्के वाटा कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केला आहे. तर 62.89 टक्के वाटा सार्वजनिक शेअरधारकांनी धारण केला आहे. कंपनीच्या इतर वैयक्तिक प्रवर्तकांमध्ये किशोर पूनमचंद ओसवाल आणि संगीता पूनमचंद ओसवाल यांनी कंपनीचे 2,21,31,346 शेअर्स होल्ड केले आहेत.
सीएनआय रिसर्च लिमिटेड कंपनीचा व्यवसाय विस्तार जागतिक स्तरावर झाला आहे. या कंपनीने अनेक परकीय एजन्सीसोबत व्यावसायिक करार केला आहे. जागतिक स्तरावर सीएनआय रिसर्च कंपनीने रॉयटर्स, डाऊ जॉन्स यासारख्या दिग्गज संस्थासोबत भागीदारी केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.