
Cochin Shipyard Share Price | कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सरकारी डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोचीन शिपयार्ड स्टॉक 14.18 टक्के वाढीसह 1,123 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.07 टक्क्यांच्या वाढीसह 1,092.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 6 महिन्यांत कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 166.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी कोचीन शिपयार्ड लिमिटेड स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 1,101.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची पुढची टार्गेट प्राईस
ब्रोकरेज फर्म SBI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, कोचीन शिपयार्ड कंपनीच्या शेअरने मागील 4-5 महिन्यांत मजबूत वाढ नोंदवली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या किंमत गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड स्टॉकमध्ये पैसे लावताना 980 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या मते कोचीन शिपयार्ड स्टॉक अल्पावधीत 1,205 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
कंपनीबद्दल थोडक्यात
कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी कंपनी म्हणून ओळखली जाते. कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीची स्थापना भारत सरकारने 1972 साली केली होती. ही कंपनी मुख्यतः जहाज बांधणी संबंधित काम करते. ही कंपनी तेल टँकर, कंटेनर जहाजे, प्रवासी जहाजे आणि संरक्षण जहाजांसह मोठ्या विमान वाहू जहाजे बनवण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी मोठ्या युद्ध नौकांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे काम देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.