 
						Multibagger Stock | कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड ही कंपनी पॅकेजिंग उद्योग क्षेत्रात काम करत असून आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. कमर्शिअल सिन बॅग्स कंपनी 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळातील सदस्य बोनस शेअर्स वाटप करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करतील.
कंपनीचा व्यापार आणि उत्पादन क्षमता :
कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड कंपनी मुख्यतः टारपॉलिन, FIBC, विणलेल्या सॅक, BOPP पिशव्याचे उत्पादन करते. ही कंपनी 50 वर्षे चौधरी ग्रुपशी संलग्न आहे . कंपनीची व्यावसायिक पिशव्यांची वार्षिक उत्पादन क्षमता 21000MT पेक्षा अधिक आहे. ही कंपनी वार्षिक 4-5 दशलक्ष पिशव्याचे निर्मिती करते. कमर्शियल सिन बॅग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388 रुपये आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 211.60 रुपये होती.
कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ :
कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील अडीच वर्षांत 610 टक्क्यांहून अधिक वधारली आहे. 22 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 41.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी कमर्शियल सिन बॅग्स कंपनीचे शेअर्स 318.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 38 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 30 टक्केपेक्षा अधिक वर गेली आहे. कमर्शियल सिन बॅग्स कंपनीचे बाजार भांडवल 423.69 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		