12 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IPO Investment | आला रे आला आयपीओ आला! दोन कंपन्यांचे IPO लाँच होतं आहेत, गुंतवणुकीपूर्वी डिटेल्स वाचा

IPO Investment

IPO Investment | 2022 हे वर्ष संपत आले आहे. आणि वर्षाच्या शेवटी शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अनेक नवीन कंपन्याचे शेअर बाजारात सूचिबद्ध झाले आहे. अनेक कंपन्या अजूनही आपले आयपीओ लाँच करण्यासाठी रांगेत आहेत. नुकताच आलेल्या बातमीनुसार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली Rare Enterprises समर्थित Concord Biotech आणि वैभव जेम्स या दक्षिण भारतातील आघाडीची दागिने बनवणारी कंपनी आपले IPO शेअर बाजारात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या दोन्ही कंपन्यांना मार्केट रेग्युलेटर सेबीने मंजुरी दिली आहे.

IPO ला मंजुरी :
या दोन्ही कंपन्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात स्टॉक मार्केट नियामक सेबीकडे IPO साठी प्राथमिक कागदपत्रे सबमिट केले होते. सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या कंपन्यांना 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत IPO साठी मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. कोणत्याही नवीन कंपनीला आपले IPO बाजारात गुंतवणुकीसाठी खुले करायचे असेल तर, सेबीची मंजुरी घेणे आवश्यक असते. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स IPO खुला झाल्यावर बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकावर लिस्ट केले जातील.

Concord Biotech IPO बद्दल :
स्टॉक मार्केट नियामक सेबीकडे सादर केलेल्या माहितीनुसार Concord Biotech कंपनीचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल साठी जरी केला जाणार आहे. या IPO मध्ये खाजगी इक्विटी फर्म क्वाड्रिया कॅपिटल-समर्थित हेलिक्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स कंपनी आपले 2,09,25,652 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहे. कॉनकॉर्ड कंपनी किण्वन-आधारित बायोफार्मास्युटिकल एपीआयची भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपन्यापैकी एक आहे. ही कॉमन इम्युनोसप्रेसंट, ऑन्कोलॉजी, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल यांवरील औषध उत्पादन करते. गुजरातमध्ये वालथेरा, ढोलका आणि लिंबासी या तीन ठिकाणी कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र कार्यरत आहेत.

वैभव जेम्स कंपनीच्या IPO बद्दल :
वैभव जेम्स कंपनी आपल्या IPO मध्ये 210 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स विकून भांडवल उभारणी करणार आहे. याशिवाय या कंपनीची एक प्रवर्तक संस्था आपले 43 लाख शेअर्स विक्रीसाठी बाजारात जारी करणार आहे. ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून जी भांडवल उभारणी करेल, त्या पैशांतून 8 नवीन शोरूम उघडण्यासाठी खर्च करणार आहे. या शेअरची किंमत 12 कोटी रुपये आहे. वैभव जेम्स कंपनी FY23 आणि FY24 साठी 160 कोटी रुपयांची इन्व्हेंटरी खरेदी करणार आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी मुख्य कार्यालय असलेली वैभव जेम्स कंपनी सोने, हिरे, रत्न, प्लॅटिनम आणि चांदीचे दागिने अशा वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनी आपल्या ग्राहकांना सोन्याचे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रीमियम ब्रँड देखील ऑफर करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Concord Biotech And Vaibhav Gems IPO ready to launch soon after getting approval from SEBI for IPO Investment on 07 December 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x