5 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर अल्पावधीत मजबूत परतावा देईल, तज्ज्ञांनी जाहीर केलेली टार्गेट प्राईस पहा

L&T Share Price

L&T Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी खूप आकर्षक वाटत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स स्थिर वाढीसह ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, भारताच्या कॅपेक्स वाढीचा परिणाम लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर वाढीवर पाहायला मिळू शकतो. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 1.01 टक्के वाढीसह 3,080.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जेफरीज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो स्टॉकची लक्ष्य किंमत 3400 रुपये निश्चित केली आहे. 24 नोव्हेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 3054 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 11-12 टक्के परतावा सहज देऊ शकतात. मागील एका वर्षात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.28 लाख कोटी रुपये आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,117.55 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

जेफरीज फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, भारताच्या कॅपेक्स अपसायकलचा सकारात्मक परिणाम लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्याच्या शेअरवर पाहायला मिळू शकतो. YTD आधारे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरने निफ्टीच्या तुलनेत 35 टक्के अधिक परतावा दिला आहे. संरक्षण क्षेत्रातील प्रदर्शनाबाबत लार्सन अँड टुब्रो कंपनी व्यवस्थापन ESG एजन्सीसोबत सक्रिय चर्चा करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE 29 November 2023.

हॅशटॅग्स

L&T Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x