27 November 2022 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Multibagger Stocks | या शेअरने एक लाखावर दिला 92 लाखाचा मल्टीबॅगर परतावा, त्यावर अजून फ्री बोनस शेअर्स, तुमच्याकडे आहे स्टॉक?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात भारत सरकारच्या मालकीच्या बऱ्याच कंपन्या ट्रेड करत आहेत. त्यांची मालकी ही पूर्णपणे भारत सरकारकडे असते. भारत सरकार आपल्या मालकीच्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध करून त्यातून भांडवल उभारणी करत आहेत. ह्या कंपन्या जबरदस्त व्यापार करतात. अशीच एक सरकारी कंपनी आहे, जीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना कमी परतावा दिला आहे. आपण या लेखात ह्या सरकारी कंपनीची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही कंपनी आहे गेल इंडिया लिमिटेड.

गेल इंडियाच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना पाच वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी GAIL india या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती,तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 90 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले असते. गेल इंडिया कंपनीला भारत सरकार कडून महारत्न दर्जा प्राप्त झाला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 115.67 रुपये नोंदवण्यात आली होती.

बोनस शेअर्सचा इतिहास :
13 सप्टेंबर 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 7.92 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी जर तुम्ही तेव्हाच्या किमतीनुसार एक लाख रुपयेची गुंतवणूक केली असती,तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 92 लाखांहून अधिक झाले असते.

बोनस शेअर सकट एकूण परतावा :
3 सप्टेंबर 2002 रोजी जर तुम्ही गेल इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला त्यावेळी 12626 शेअर्स मिळाले असते. तेव्हापासून आतापर्यंत या महारत्न कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक आजपर्यंत होल्ड करून ठेवली असती, तर बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्याकडे एकूण 101007 शेअर्स झाले असते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 91.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या ट्रेडिंग किमतीनुसार तुमच्या 101007शेअर्सचे बाजार मूल्य 92.26 लाख रुपये झाले असते.

20 वर्षात 5 वेळा बोनस शेअर्स जाहीर :
सरकारी महारत्न कंपनी गेल इंडियाने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. ऑक्टोबर 2008 मध्ये GAIL India कंपनीने 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते. मार्च 2017 मध्ये कंपनीने 1:3 प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले होते. त्यानंतर, कंपनीने मार्च 2018 मध्ये आपल्या भागधारकांना 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले. जुलै 2019 रोजी GAIL India कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर केले. म्हणजेच कंपनीने भागधारकांना प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस मोफत दिला होता. सरकारी गेल इंडियाने नुकतेच 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of GAIL India Share Price in focus check details 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x