14 June 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

Tata Sons IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा सन्स IPO लाँच होणार? टाटा सन्स कंपनीला IPO लाँचबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या

Tata Sons IPO

Tata Sons IPO | सहसा जेव्हा कंपन्याना भांडवल उभारणी करायची असते, तेव्हा ते स्वेच्छेने आपले IPO शेअर बाजारात लाँच करून शेअर सूचिबद्ध करत असतात. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स बाबत विपरीत परी निर्माण झाली आहे. झाले असे की, टाटा सन्स कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात आपला आयपीएल लाँच करावा लागणार आहे. पुढील 2 वर्षात टाटा सन्स कंपनी IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाणार आहे.

स्टॉक सूचीबद्ध करण्याचे कारण

वास्तविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाटा सन्स कंपनीचे वर्गीकरण ‘अप्पर-लेयर’ नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून केले होते. आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘अप्पर-लेयर’ NBFC कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणे अनिवार्य आहे. आरबीआयच्या नियमांनुसार ज्या ‘अप्पर लेयर’ NBFC कंपन्या सूचीबद्ध नाही, त्यांना तीन वर्षांच्या आत शेअर बाजारात सूचीबद्ध होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आता या नियमाच्या कचाट्यातून बाहेर येण्यासाठी टाटा सन्स गृप इतर पर्यायांचा शोध घेत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये RBI ने टाटा सन्स ग्रुप कंपनीला NBFC म्हणून वर्गीकृत केले होते. टाटा सन्स कंपनीमध्ये टाटा ट्रस्टचा एकूण वाटा 66 टक्के आहे. आणि शापूरजी पालोनजी ग्रुपचा वाटा 18.4 टक्के आहे. टाटा सन्स ही टाटा उद्योग समूहाची होल्डिंग कंपनी असून, टाटा समूहाच्या सर्व कंपन्या टाटा सन्स अंतर्गत येतात.

सर्वात मोठा IPO ठरेल

तज्ञांच्या मते, जर टाटा सन्स कंपनीचा IPO बाजारात लाँच झाला तर तो शेअर धारकांसाठी वरदान ठरेल. टाटा सन्स कंपनीचे बाजार भांडवल 11 लाख कोटी रुपये आहे. जर या कंपनीने आपले 5 टक्के शेअर्स जरी IPO मध्ये लाँच केले, तरी त्या IPO चा सर्वसाधारण आकार 55,000 कोटी असेल. म्हणजेच टाटा सन्स कंपनीचा IPO भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरेल. एलआयसी कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा त्याचा आकार 21 हजार कोटी रुपये होता.

तज्ञांचे मत

एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते आरबीआयने NBFC म्हणुन वर्गीकरण करून देखील या कंपनीकडे पुनर्रचनेचा दुसरा पर्याय उपलब्ध आहे. टाटा सन्स कंपनीची पुनर्रचना करून कंपनीला आरबीआयच्या अप्पर स्तरावरील एनबीएफसी यादीतून वगळता येऊ शकते. मात्र तज्ञांच्या मते टाटा सन्स IPO तीन वर्षांच्या आत लॉन्च होण्याची शक्यता अधिक आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातील 15 NBFC कंपन्यांना अप्पर स्तरावरील NBFC कंपनीचा दर्जा दिला होता.

यामध्ये LIC हाउसिंग फायनान्स, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, L & T फायनान्स, पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स, पीएनबी हाउसिंग फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स, मुथूट फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, या कंपन्या सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Sons IPO today on 18 September 2023.

हॅशटॅग्स

Tata Sons IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x