12 December 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत मोठी बातमी, रिलायन्स पॉवर शेअर नेमका काय परिणाम होणार? डिटेल्स वाचा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीच्या कर्जदात्यानी कर्ज निराकरण प्रक्रिया आयोजित करण्यासाठी SBI ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. सल्लागार म्हणून SBI Caps कंपनी VIPL वन टाईम रिझोल्यूशनसाठी बोली मागविणार आहे. (Reliance Power Share Price Today)

SBI प्राइम बिडरच्या निवडीशी संबंधित मापदंड आणि सूचना निर्धरणाचे काम करणार आहे. एसबीआय कॅप्स VIPL कंपनीचे 2,000 कोटी रुपयेचे थकित कर्ज निराकरण करण्यासाठी पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर (Reliance Power) कंपनीचे शेअर्स 14.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

SBI कॅप्स ला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सल्लागाराच्या नियुक्तीशी संलग्न केलेल्या सेवा अटींनुसार कर्ज निराकरण प्रक्रिया हाताळताना SBI Caps ला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या नियमांनुसार चालवणे अनिवार्य आहे. (Reliance Power Share)

VIPL कंपनीच्या कर्जदात्याकडून पूर्वी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. रिलायन्स पॉवर कंपनी या VPIL च्या प्रवर्तक कंपनीनेही 1,260 कोटीचे वन टाइम सेटलमेंट ऑफर दिले होते. याशिवाय अहमदाबाद स्थित CFM मालमत्ता पुनर्रचना आणि NARCL ने देखील ऑफर जाहीर केल्या होत्या. (Reliance Power Share Rate)

CFM ने रिलायन्स पॉवर कंपनीच्या उपकंपनी VPIL च्या कर परतफेडीसाठी 1,260 कोटी रुपयेची ऑफर दिली आहे. तर NARCL ने 1,120 कोटी रुपयेची बोली लावली आहे. एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2008 नंतर या स्टॉकमध्ये 94 टक्के घसरण झाली, आणि शेअर सध्याच्या किमतीवर आला.

मात्र मागील तीन महिन्यात सेन्सेक्सच्या तुलनेत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.59 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x