21 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
x

ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO लाँच होणार, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा

Highlights:

  • ideaForge Technology Share Price
  • आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीमध्ये इन्फोसिसची गुंतवणूक :
  • IPO तपशील
  • कंपनीची योजना
ideaForge Technology Share Price

ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी ड्रोन निर्माता कंपनीचा आयपीओ 26 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओमुळे इन्फोसिस कंपनीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ आल्याने इन्फोसिस कंपनीला 6.3 पट फायदा होणार आहे. इन्फोसिस कंपनीने आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 6 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीमध्ये इन्फोसिसची गुंतवणूक :

डिसेंबर 2016 मध्ये इन्फोसिस कंपनीने ड्रोन निर्माता आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यानंतर इन्फोसिस कंपनीने आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या स्टार्ट-अप कंपनीचे 16,47,314 शेअर्स म्हणजेच जवळपास 4.35 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती. आता या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 638 रुपये ते 672 रुपये दरम्यान जाहीर केली आहे.

IPO तपशील

आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 26 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या वर्षी जूनमध्ये इन्फोसिस कंपनीने Series A राऊंडमध्ये आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचे 12,20,852 शेअर्स 80.73 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते. तर Series B मध्ये इन्फोसिस कंपनीने 4,03,862 शेअर्स 185.71 रुपये किमतीवर खरेदी केले होते. इन्फोसिस कंपनीने एकूण 16,24,714 शेअर्स खरेदी करण्यासाठी 17.35 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.

कंपनीची योजना

आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओच्या अप्पर किंमतीनुसार इन्फोसिस कंपनीचे गुंतवणूक मूल्य 110.15 कोटी रुपये होईल. यामुळे इन्फोसिस कंपनीला 6.34 पट अधिक फायदा होणार आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO आकार 566 कोटी रुपये असणार आहे.

या आयपीओद्वारे उभारलेल्या पैसा आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनी 50 कोटी रुपयेचे कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. तर 150 कोटी रुपये खेळते भांडवल म्हणून खर्च केले जाणार आहे. कंपनी उत्पादन विकासासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ideaForge Technology Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

ideaForge Technology Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x