 
						Concord Biotech IPO | कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड या औषधांचा कच्चा माल बनवणाऱ्या कंपनीचा IPO मागील आठवड्यात शुक्रवारी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO इश्यूच्या पहिल्या दिवशी हा स्टॉक 58 टक्के सबस्क्राईब झाला होता. NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 1,46,50,957 शेअर्स जारी केले होते. त्या तुलनेत IPO ला पहिल्या दिवशी 85,05,660 शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाची कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड IPO डिटेल :
कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी जेवढा कोटा राखीव ठेवला होता, तो पूर्ण सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 72 टक्के खरेदी झाला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा फक्त एक टक्के सबस्क्राईब झाला. कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 705 रुपये ते 741 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड जीएमपी :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 199 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 4 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 199 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर हा ट्रेंड असाच टिकुन राहिला तर कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 940 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
अहमदाबाद स्थित कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीने पूर्ण IPO ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केला आहे. या कंपनीने मागील आठवड्यात गुरुवारी अँकर गुंतवणूकदारांकडून 465 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. जर हा IPO स्टॉक अप्पर प्राइस बँडवर वाटप केला गेला तर कंपनीला IPO च्या माध्यमातून एकूण 1,550.59 कोटी रुपये मिळतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		