
Credit Card Payment | देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. आता लोक डेबिट कार्डसह क्रेडिट कार्डचाही बेसुमार वापर करत आहेत. अनेकदा क्रेडिट कार्डमुळे लोकांचा खर्च जास्त होतो. बिले भरताना खिशात पैसे नसतात. त्यांना बिले भरता येत नाहीत. जर तुम्हीही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास असमर्थ असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकला असाल तर येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला क्रेडिट कार्डकर्जाचे ओझे कमी करण्यास मदत करू शकतात.
बिलाचे EMI मध्ये रुपांतर करा
अनेकवेळा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास भरमसाठ दंड आणि व्याज भरावे लागते. अशावेळी क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला ईएमआयचा पर्याय देतात, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शनला ईएमआयमध्ये रुपांतरित करू शकता. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो.
बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा वापर करा
बॅलन्स ट्रान्सफर सुविधेमुळे आपण आपल्या विद्यमान क्रेडिट कार्डची थकबाकी दुसर्या क्रेडिट कार्डवर हस्तांतरित करू शकता. जर तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असेल आणि मग तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची थकीत रक्कम दुसऱ्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करू शकता. मात्र, शिल्लक रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी नवीन क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेचे शुल्क जाणून घ्यावे.
बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेऊ शकता
जर तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असेल तर ईएमआय आणि बॅलन्स ट्रान्सफरव्यतिरिक्त पर्सनल लोन तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. सर्वसाधारणपणे पर्सनल लोनचे व्याजदर तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जापेक्षा खूपच कमी असतात. ज्यांच्या क्रेडिट कार्डचे कर्ज मोठे आहे त्यांच्यासाठी हा पर्याय विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.