8 December 2021 7:16 PM
अँप डाउनलोड

केरळ'साठी मदत निधीच्या नावाने पेटीएम'चे मालक विजय शेखर शर्मा यांचं नोटबंदीनंतर पुन्हा प्रोमोशन-ब्रॅण्डिंग

मुंबई : संपूर्ण केरळला पावसाने काही दिवस झोडपले असून सर्वत्र पुराचे साम्राज्य असून त्यात लाखो लोकं बेघर झाले आहेत तर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळला सर्वच थरातून मदत होत असताना त्यात केंद्र सरकार, अनेक राज्य सरकार आणि सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु असताना एक कटू अनुभव आल्याचे दृश्य आहे. कारण देशातील एका अब्जाधीशाने अशा संवेदनशील विषयात सुद्धा स्वतःच्या कंपनीचे प्रोमोशन आणि ब्रॅण्डिंग करत हात धुतले आहेत.

आतापर्यंत केरळातील या महापुरात जवळपास ३५० लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण देशभर केरळातील निसर्गाचं संकट दूर व्हावं म्हणून प्रार्थना तसेच मदतीचा ओघ सुरु असताना पेटीएम’चे मालक विजय शेखर शर्मा यांनी केवळ १०,००० रुपयांची मदत करून, त्या ऑनलाईन मदतीचा स्क्रिनशॉट समाज माध्यमांवर शेअर करत लोकांना पेटीएम’चा पालफॉर्म वापरात मदत करण्याची विनंती केली आहे. शेवटी त्यामार्फत सुद्धा पेटीम’चा आर्थिक लाभ होणार असल्याने विजय शेखर शर्मा यांच्या या प्रयोगावर नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत.

पेटीएम’चे मालक विजय शेखर शर्मा हे १२,००० कोटीचे मालक असून ते भारतातील पहिल्या शंभर श्रीमंतांमध्ये येतात. परंतु त्यांनी केरळ मदत निधीसाठी केवळ १० हजार रुपये दान करत त्याचा स्क्रिनशॉट समाज माध्यमांवर शेअर करत इतरांना मदतीचं आवाहन करत पेटीएम’चा वापर करण्यासाठी पोस्ट टाकली. त्यामुळे आपल्या ब्रँडची जाहिरात करताना, त्यांनी इतक्या खालची पातळी गाठल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

विशेष म्हणजे मागील दोन दिवसात ४ लाख पेटीएम युजर्संने केरळ’ पुरग्रस्थांसाठी पेटीएमद्वारे तब्बल २० कोटींचा निधी जमा केला आहे. परंतु स्वतः केवळ दहा हजार जमा केल्याने नेटिझन्सना त्याचा प्रोमोशनचा फंडा ध्यानात आल्यावर नेटिझन्सने त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. त्याचे संधी मिळताच प्रोमोशनचा हा पहिलाच प्रयोग नसून या आधी सुद्धा नोटबंदीचा काळात पंतप्रधानांचा फोटो वापरत ‘पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या’ मिशनमध्ये सामील होण्याचं ते वारंवार समाज माध्यमांवरून आवाहन करत होते. त्याचा प्रत्यय असा झाला की कंपनीने मागील ८ वर्षात जितका नफा कमावला नव्हता तेवढा नफा केवळ २-३ महिन्यात कमवून कंपनी एका नव्या आर्थिक उंचीवर नेऊन ठेवली.

नेमकी काय पोस्ट टाकली आहे विजय शेखर शर्मा यांनी;

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x