
Cupid Share Price | क्यूपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट मिळवून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 914 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधील 863 रुपये बंद किमतीच्या तुलनेत क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 925 रुपये होती. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 907.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात क्युपिड लिमिटेड या फार्मा कंपनीच्या शेअरची किंमत 748 रुपयेवरून वाढून 914 रुपये किमतीवर गेली होती. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 20 टक्के नफा कमावला होता. मागील सहा महिन्यांत क्युपिड लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 246 रुपयेवरून 914 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात गुंतवणूकदारांनी 275 टक्के परतावा कमावला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.
क्युपिड लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पुरुष आणि महिलांसाठी कंडोम बनवण्याचे काम करते. या कंपनीने मुंबईजवळ एका औद्योगिक परिसरात जमीन खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. म्हणून क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
क्यूपिड लिमिटेड कंपनीने आपली सध्याची उत्पादन क्षमता 1.5 पट वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. परिणामी क्युपिड लिमिटेड कंपनीच्या पुरुष कंडोमचे उत्पादन वार्षिक 770 दशलक्ष आणि महिला कंडोमचे उत्पादन वार्षिक 75 दशलक्ष पर्यंत वाढेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.