14 December 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

BHEL Share Price | भरवशाचा बीएचईएल शेअर अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घेण्यासाठी वेळीच एंट्री घेणार?

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

विजेच्या मागणीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे भारतीय ऊर्जा मंत्रालयाने नुकताच थर्मल कॅपेक्स विकसित करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. याचाच सकारात्मक परिणाम बीएचईएल कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस नुवामाने पुढील 12 महिन्यांच्या कालावधीसाठी बीएचईएल शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी बीएचईएल स्टॉक 0.91 टक्के वाढीसह 178.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामाने बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीचे खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 225 रुपये स्पर्श करू शकतात. 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ञांच्या मते, सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 32 टक्के अधिक वाढू शकतो. मागील 6 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2023 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअरची किंमत 116 टक्के वाढली आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या मते, विजेच्या वाढत्या मागणीमुळे आणि अक्षय ऊर्जाच्या माध्यमातून 24/7 वीज पुरवठा प्रदान करण्याची क्षमता नसल्याने भारतीय ऊर्जा मंत्रालयाने थर्मल कॅपेक्सचे लक्ष्य 50-55 GW पर्यंत वाढवले आहे. हे प्रमाण पूर्वी 30GW होते. बीएचईएल कंपनीला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3GW क्षमतेच्या थर्मल ऑर्डर मिळल्या आहेत आणि जवळपास 7.4GW क्षमतेच्या ऑर्डर्स निविदा प्रक्रियेत प्रलंबित आहेत.

या ऑर्डरची पूर्तता आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होऊ शकते. आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरीस बीएचईएल कंपनीकडे 6-7GW थर्मल OI आणि 50 टक्के मार्केट शेअर असेल असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. बीएचईएल कंपनीचा EPS आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये 56 टक्के/32 टक्के/99 टक्के CAGR राहण्याचा अंदाज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x