Cupid Share Price | अशी संधी सोडू नका! मल्टिबॅगर परतावा देणारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक स्प्लिटचा सुद्धा फायदा

Cupid Share Price | आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून शेअर बाजारात मजबूत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )

क्यूपिड लिमिटेड कंपनीने मोफत बोनस शेअर्स वाटप करून स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.24 टक्के वाढीसह 2430.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी क्यूपिड स्टॉक 3.93 टक्के घसरणीसह 2,328 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये क्यूपिड कंपनीचे शेअर 19 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3261.12 कोटी रुपये आहे. क्यूपिड कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 1:10 या प्रमाणात स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या शेअर विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 4 एप्रिल 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

शेअर विभाजनाव्यतिरिक्त, क्यूपिड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 4 एप्रिल 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-2024 च्या डिसेंबर तिमाहीत क्यूपिड कंपनीने 16 टक्के वाढीसह 34.46 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कालावधीत कंपनीने 73 टक्के वाढीसह 5.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. क्यूपिड कंपनीचा ऑपरेटिंग नफा वार्षिक आधारावर 132 टक्के वाढीसह 12.15 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cupid Share Price NSE Live 01 April 2024.