29 April 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Stock in Focus | हा शेअर देशातील आणि विदेशातील गुंतवणूकदार सुद्धा का खरेदी करत आहेत? खरेदीपूर्वी नेमकं कारण काय पहा?

Stock In Focus

Stock In Focus | Keystone Realtors ही रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी आपला IPO बाजारात गुंतवणुकीसाठी घेऊन आली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स सध्या 566 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कीस्टोन रियल्टर्स कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई निर्देशांकावर 24 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आली होती. ही कंपनी भारतातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी रुस्तमजी ग्रुप अंतर्गत उद्योग करते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये UK स्थित गुंतवणूक फंड कंपनी प्लुटस वेल्थ मॅनेजमेंट फर्मने या कंपनीतील बहुसंख्य भाग भांडवल खरेदी केल्याची घोषणा केली, आणि स्टॉकने लगेच रॉकेट सारखी उड्डाण भरली.

प्लुटस वेल्थ मॅनेजमेंट फर्मने कीस्टोन रिअल्टर्स कंपनीमधील 17.1 लाख शेअर्स महणजेच 1.5 टक्के भाग भांडवल सरासरी 555.03 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने अधिग्रहण केले आहे. हा संपूर्ण खरेदी व्यवहार 94.91 कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,454.57 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Keystone Realtors कंपनीचे शेअर 2.60 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये या स्टॉकची इश्यू किंमत 541 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.

IPO नुकताच आला होता :
14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022 दरम्यान Keystone Realtors कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 514 रुपये ते 541 रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आली होती. या कंपनीच्या IPO मध्ये जारी करण्यात आलेले शेअर्सचे 21 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप करण्यात आले होते. कीस्टोन रिअलटर्स कंपनीच्या एका IPO चे लॉटमध्ये 27 शेअर्सचा समावेश होता.

गुंतवणूकदारांचा प्रतिसाद :
कीस्टोन रियल्टर्स कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अपेक्षेप्रमाणे असा खूप जबरदस्त प्रतिसाद दिला नाही. IPO च्या शेवटच्या दिवशी फक्त 2.01 पट स्टॉक सबस्क्राईब झाले होते. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 3.84 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. उच्च निव्वळ मूल्य असलेल्या गुंतवणूकदारांनी तीन पट अधिक स्टॉक खरेदी केले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा फक्त 0.53 पट सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Keystone Realtors IPO stock In Focus of Stock market expert for investment and earning huge Return on investment on 28 November 2022

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x