15 April 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 15 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Israel Vs Iran Military Power | युद्ध उफाळल्यास इराण देश इस्राईलचा माज उतरवू शकतो, अशी आहे लष्करी ताकद Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! बँक FD वर मिळतंय 8.75% व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीच्या दिशेने, टॉप ब्रोकिंगने पुढच्या टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले? Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा
x

पोलीस भरतीचा सर्व्हर उप-डाऊन नंतर अखेर उप झाला, उरले केवळ २ दिवस, लवकर अर्ज करा

Maharashtra Police Recruitment 2022

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्र पोलिस विभागाने नुकतेच रिक्त पद जाहीर केले असून ०९ नोव्हेंबर २०२२ पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 18303 कॉन्स्टेबल पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलिस भरती 2022 साठी 09 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पद नाही, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा, यासारखे अधिक तपशील आधीच जाहीर करण्यात आले आहेत. मात्र आता एक गंभीर अडचण समोर आली आहे.

ऑनलाईन प्रवेशही सुरू झाले असले तरी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गेलेल्या इच्छुकांना प्रचंड मनस्ताप आणि धावपळ करावी लागत आहे. कारण सर्व्हर डाऊन झाल्याने पोलीस भरतीसाठीची वेबसाईट ओपन होत नाही. http://policerecruitment2022.mahait.org/ या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यावर “The service is unavailable” असं मसेज स्क्रीनवर दिसत आहे.

त्यामुळे इच्छुकांची मोठी अडचण झाली आहे. वारंवार सर्व्हर डाऊन दाखवत असल्याने इच्छुक उमेदवार धावपळ करून इतर सायबर कॅफेत जाऊन प्रयत्न करत आहेत, मात्र मूळ सर्व्हर डाऊन असल्याने सर्वकाही निष्फळ ठरतंय आणि पैसे देखील वाया जातं आहेत.

याबाबत गृहमंत्रालयाने काही हस्तक्षेप किंवा पाठपुरावा केला आहे का? याबाबतही कोणतीही माहिती इच्छुकांना नाही. एकाबाजूला अर्ज करण्याचे शेवटचे २ दिवस उरले आहेत आणि त्यात उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सरकार विरोधात काही नकारात्मक घडल्यास पुन्हा वेगळा सरकारी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निदान प्रशासन तरी काय कामं करतंय का हे समजायला मार्ग नाही. मात्र काही वेळापूर्वी हा सर्व्हर उप झाला आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करावा, कारण केवळ दोन दिवस उरले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Police Recruitment 2022 policerecruitment2022 website server down check details on 28 November 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Police Recruitment 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x