 
						DCM Financial Services Share Today | ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सलग पाच दिवसापासून 10 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 9.45 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 65.48 टक्के वाढले आहेत. (DCM Financial Services Limited)
11 एप्रिल 2023 रोजी ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 148.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. DCM फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एका वर्षात शेअरची किंमत 2.65 रुपयांवरून वाढून 6.34 रुपयांवर पोहचली आहे.
मागील पाच वर्षांत ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरची किंमत 223.26 टक्के वाढली आहे. या काळात शेअरची किंमत 1.95 रुपयांवरून वाढून 6.95 रुपये किमतीवर पोहचली आहे. ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनी मुख्यतः उपकरणे भाड्याने देणे, भाड्याने घेणे, आंतर-कॉर्पोरेट ठेवी, बिल सवलत इत्यादी सेवा प्रदान करण्याचे काम करते.
‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 11.91 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 11.99 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		