
DEN Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2630 कोटी रुपये आहे. DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.20 रुपये होती. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के घसरणीसह 53.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनी अंश )
मागील 6 महिन्यांत डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 44.35 रुपये या किंमत पातळीवरून 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. DEN नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 30 रुपये या किंमत पातळीपासून 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी DEN नेटवर्क कंपनीचे शेअर्स 52 ते 56 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 48 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांच्या मते, डेन नेटवर्क कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 2 महिन्यांच्या चढ उतारानंतर DEN नेटवर्क कंपनीच्या शेअर्सनी लोअर ट्रेंड लाइन झोनजवळ सपोर्ट बनवला आहे. DEN नेटवर्क स्टॉकने आपल्या 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या जवळ एक डोजी कँडलस्टिक तयार केली आहे. त्यामुळे हा स्टॉक अल्पावधीत वाढीचे संकेत देत आहे.
DEN नेटवर्क्स कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक तेजीचे संकेत मिळत आहेत. या स्टॉकमध्ये RSI आणि MACD चार्टवर तेजीचा क्रॉसओव्हर पाहायला मिळत आहे. DEN नेटवर्क लिमिटेड ही कंपनी मास मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा आणि उत्कृष्ट व्हिज्युअल मनोरंजन प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनी विविध प्रसारकांकडून मीडिया कंटेंट जमा करते आणि पब्लिष करते. कंपनीच्या दर्शकांची संख्या 13 दशलक्षापेक्षा जास्त आहे. DEN नेटवर्क ही कंपनी भारतात 13 राज्यांमध्ये काम करत असून 433 शहरात आपल्या सेवा प्रदान करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.