 
						Divis Labs Share Price | फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिव्हिस लॅबोरेटरीजचा शेअर 5093.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 3287.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पडला आहे. सप्टेंबर 2022 या तिमाहीत महसुलात तोटा झाल्यामुळे या शेअर मध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या तिमाही दर तिमाही महसुलात 17.43 टक्केची घट पाहायला मिळाली आहे. 3 वर्षातील ही महसुलातील सर्वात जास्त घसरण आहे. त्याच वेळी, कंपनीच्या 29.04 टक्केच्या CAGR वर झालेली वार्षिक महसुली वाढ, तिच्या मागील 3-वर्षांच्या महसुलाच्या तुलनेत 20.93 टक्के CAGR पेक्षा जास्त आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 25.51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
जर तुम्ही डिव्हिस लॅब्स कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षात 33 टक्क्यांहून जास्त कमजोर झाली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे 16 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. डेव्हिस लॅब कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 12 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाले आहेत.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला :
Divis Labs कंपनीच्या शेअर बाबत 21 तज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यापैकी 5 तज्ञ हे स्टॉक विकून त्वरित बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत. 2 जणांनी स्टॉक विक्रीचा कॉल दिला आहे. ज्यांनी हा स्टॉक उच्च किमतीवर विकत घेतला आहे, त्यांना 6 तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. तथापि, इतर 6 तज्ञ Divis Labs कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची खरेदीची शिफारस करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		