Dixon Technologies Share Price | पैशाचा पाऊस! डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरने मागील 1 महिन्यात 35% परतावा दिला, मागील 3 वर्षात 300% परतावा

Dixon Technologies Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3867.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2018 मध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी आणि सध्याची किंमत

30 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 2,554.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.  13 सप्टेंबर 2022 रोजी डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4,670 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 3,944.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा दिला

डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि, मागील दोन वर्ष आणि एक वर्षांच्या कालावधीत डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने लोकांना नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र मागील तीन महिन्यांच्या कालावधीत डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने लोकांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 35.60 टक्के वाढवले आहेत.

डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीबद्दल

डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनी Xiaomi मोबाईल फोनचे उत्पादन आणि निर्यात करण्यासाठी Xiaomi India ची स्थापना करण्याचा विचार करत आहे. डिक्सन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्या डिक्सनच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे भारतात व्यवसाय विस्तार करतील.

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा उद्योगाने बहुतेक जागतिक मोबाइल फोन उत्पादक आणि त्यांच्या पुरवठा साखळी भागीदारांनी उत्पादनात गुंतवणूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. भारतीय ईएमएस उद्योग पुढील काही वर्षांत आपली क्षमता वाढवण्यासाठी सज्ज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dixon Technologies Share Price today on 1 June 2023.