14 December 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Mutual Funds SIP | तुम्ही 5000 रुपयांपासून गुंतवणुक सुरू करा, अशाप्रकारे 11 कोटी रुपयांचा दीर्घकालीन परतावा मिळेल

mutual fund SIP

Mutual Funds SIP | गुंतवणूक कोणतीही असो, त्यात थोडाफार धोका तर असतोच, तशीच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अनेकदा धोकादायक मानली जाते. जर तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणुकीची चांगली माहिती असेल तर तुम्ही त्यातून चांगला परतावा मिळवू शकता.

छोटी गुंतवणुक करून जास्त नफा :
प्रत्येक गुंतवणूकदाराला छोटी गुंतवणुक करून जास्त नफा हवा असतो. मात्र, गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी याबाबत अनेकांना माहीत नसते. गुंतवणुकीची पहिली पायरी म्हणजे उत्पन्नातील काही भाग बचत करणे. जेव्हा तुम्ही बचत करता तेव्हाच तुम्ही गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही लहानपणापासूनच बचत सुरू करायला हवी. म्युच्युअल फंड बाजारातील अर्थ तज्ञ असा सल्ला देतात की, ज्या दिवसापासून तुम्ही नोकरीची सुरुवात करता, त्याच दिवसापासून गुंतवणूक करण्याची सवय लावा जेणेकरून कोणतीही आर्थिक अडचण भविष्यात टाळता येईल. चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूक करण्याची सवय लावा :
बाजारात गुंतवणुकीचे आणि चांगला परतावा मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. अर्थ तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीची सवय लहान वयापासूनच लावायला हवी. असे केल्याने गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर नफा होतो आहे की नाही हे कळण्यास बराच कालावधी लागतो. लक्षात ठेवा की ही एक दिर्घ कालीन गुंतवणूक आहे आणि यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही घर घेऊ शकता, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा इतर सर्व प्रकारची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

एसआयपीच्या माध्यमातून कोट्यवधींचा परतावा :
तूम्हाला म्युचुअल फंड गुंतवणुकीतून करोडोचा परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडाच्या मदतीने एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणार्थ, समजा एक्स हा एक तरुण गुंतवणूकदार असून, एक्सचे आज वय २५ वर्षे आहे. आता जर एक्स वयाच्या 25 व्या वर्षापासून SIP मध्ये दरमहा रु 5000 गुंतवायला सुरुवात करतो, तर 35 वर्षांनंतर एक्सला अंदाजे 11.33 कोटी रुपये परतावा मिळेल. लक्षात ठेवा की SIP मध्ये तुम्हाला दरवर्षी 10 टक्के गुंतवणूक वाढवत राहावी लागेल. तरच हा परतावा तुम्ही मिळवु शकता.

समजा :
तुमची मासिक गुंतवणूक 5000 रुपये आहे.
तुम्हाला मिळणारा व्याज परतावा अंदाजे 14% असेल.
वार्षिक SIP वाढ 10% आहे.
गुंतवणुकीचा कालावधी 35 वर्षे आहे.
गुंतवणूक रु. 1.62 कोटी रुपये असेल.
परतावा रु. 9.70 कोटी रुपये मिळेल.

मॅच्युरिटीची एकूण रक्कम 11.33 कोटी रुपये :
तर मॅच्युरिटीची एकूण रक्कम 11.33 कोटी रुपये असेल. एक महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या की SIP गुंतवणूक वार्षिक 12 टक्के परतावा देते, ज्यावर चक्रवाढ व्याजातून गुंतवणूक सतत वाढत राहते आणि तुमच्या निवृत्तीपर्यंत एक चांगला निधी तयार झालेला असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual funds SIP investment plans for long term returns on 28 July 2022.

हॅशटॅग्स

#Investment(85)#Mutual Fund SIP(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x