
Dolly Khanna Portfolio | स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणुकदारमी डॉली खन्ना यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही नवीन स्टॉक जोडले आहेत. 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत डॉली खन्ना यांनी इन्फ्रा कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार सप्टेंबर 2022 पर्यंत डॉली खन्ना यांच्याकडे जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीमध्ये 1.08 टक्के म्हणजेच 8,13,976 इक्विटी शेअर्स होल्ड आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत त्यांनी कोणतीही गुंतवणूक केली नाही.
शेअरची सध्याची ट्रेडिंग किंमत :
सध्या जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचं शेअर 224.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत शेअरची किंमत 0.88 टक्के वाढली आहे. ऑगस्टमध्ये या कंपनीच्या स्टॉकने 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमतीला स्पर्श केला होता. ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर 351.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी हा स्टॉक 149.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होता. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 1700 कोटी रुपये आहे.
जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ही एक मुंबई स्थित बांधकाम कंपनी आहे, जी इमारत बांधकाम आणि विकासक म्हणून काम करते. या कंपनीच्या शेअर्सनी 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 38 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत या स्टॉकमध्ये 40 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
डॉली खन्नाची गुंतवणूक :
नुकताच दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना यांनी ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी टॅलब्रोस ऑटोमॅटिव्ह कंपोनंट्स कंपनी आपली गुंतवणुक वाढवली आहे. या कंपनीत त्यांनी 1.22 टक्के म्हणजेच 1,50,215 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. एप्रिल-जून कालावधीत डॉली खन्ना यांच्याकडे टॅलब्रोस ऑटोमॅटिव्ह कंपोनंट्स कंपनीचे 1.10 टक्के म्हणजेच 1,35,215 शेअर्स होते. डॉली खन्ना यांनी कापड कंपनी दीपक स्पिनर्समध्ये 1.21 टक्के वाटा खरेदी केला आहे. त्यांच्याकडे दीपक स्पिनर्स कंपनीचे 86,763 इक्विटी शेअर्स आहेत. यापूर्वी त्याची एकूण गुंतवणूक 1.17 टक्के होती, जो वाढून आता 1.21 टक्के झाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.