25 March 2023 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा Campus Activewear Share Price | भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स फुटवेअर कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, गुंतवणूक करावी? डिटेल वाचा
x

Double Your Money | पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, पैसे गुंतववल्यावरच वाढतात, या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून पैसा वाढवा

Double your money

Double Your Money | आपल्याला सर्वांना पैसे कमवायचे आहेत, आणि बचत करून ते गुंतवणूक करायचे आहेत, जेणेकरून आपण त्यातून चांगला परतवा कमवू शकू. सध्याच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या लागतात रोजचा खर्च भागवणे कठीण जाते, तर बचत कशी होणार? या विचारांमुळे आपले सर्व स्वप्न अपूर्ण राहतात. पण, वस्तुस्थितीनुसार विचार केला तर आपल्याला समजेल की, चांगली जीवनशैली जगण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे कमवावे लागेल. बऱ्याच केला आपल्या आसपास लोकं पाहतो की, ते खूप पैसे कमावतात, मात्र त्यांना पैसे गुंतवणूक कुठे करायची हे समजत नाही. आर्थिक नियोजनाचे कमी ज्ञान आणि योग्य युक्ती न समजल्यामुळे अनेकदा लोक चुकीच्या योजनेत पैसे लावून अडकून जातात. त्यांना हे समजायला खूप काळ लागतो, आणि परतावा देखील हवा तसा मिळत नाही. जर तुम्हाला पैसे न बूडवता चांगला परतावा मिळवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखात ज्या टिप्स सांगणार आहोत, ते फॉलो करा.

पैसे दुप्पट करण्याचे 5 सोपे मार्ग :

1) योग्य वेळी योग्य निर्णय घ्या :
तुमच्या कमकुवत आर्थिक स्थितीला तुम्ही स्वतःच जबाबदार असतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. सोबतच योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा आपल्याला पैसे गुंतवणूक करण्याच्या खूप मोठ्या संधी मिळत असतात, मात्र, लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा संधींचा पुरेपूर फायदा घ्यायला शिका आणि पैसे वाढवा.

2) भविष्यातील नियोजन :
तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून आतापासूनच सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी चांगली योजना आखली पाहिजे. अशी एक आर्थिक योजना बनवा, जी तुमच्या वाईट काळातही तुमची आर्थिक परिस्थिती योग्यपने हाताळण्यात मदत करेल. नुसती आर्थिक योजना लिहून किंवा तयार करून चालणार नाही, तीची योग्य रीतीने अमलबजावणी देखील करा.

3) फालतू खर्च बंद :
जर तुम्हाला एक मोठी रक्कम आपल्या भविष्यासाठी जमा करायची असेल तर तुम्ही तुमचे सर्व फालतू खर्च बंद केले पाहिजे. तुमचा बहुतेक पैसा निरुपयोगी गोष्टींवर खर्च होत असेल तर तुम्ही कधीही बचत करून शकणार नाही. वीकेंड पार्ट्या, स्मोकिंग आणि महागडे गॅजेट्स खरेदी करण्यात तुमचे पैसे वाया घालवू नका. हा पैसा बँकेतील एखाद्या योजनेत, म्युचुअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवा, आणि चांगला परतावा कमवा.

4) आपत्कालीन निधी :
तुम्ही आर्थिकरित्या स्वातंत्र्य तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा तुम्ही कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच योजना बनवली असेल. तुम्ही तुमच्या भविष्यातील वाईट परिस्थितीसाठी एक आपत्कालीन निधी जमा करून ठेवला पाहिजे. कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती. ज्या लोकांनी या वेळी आपले आर्थिक नियोजन योग्य रीतीने केले होते, त्यांना या काळात जास्त त्रास सहन करावा लागला नाही. म्हणून एक आपत्कालीन निधी जमा करून ठेवा.

5) गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडा :
जमा असलेली रक्कम बचत खात्यात ठेवल्यास तुम्हाला हवा तसा परतावा मिळणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूक एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून तुम्ही जास्त परतावा कमवू शकता. शेअर मार्केटमध्ये जोखीम असते, मात्र परतावा ही खूप जास्त मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Double your money with Investment tricks and Tips check details on 15 January 2023.

हॅशटॅग्स

#Double Your Money(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x