3 May 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

PAN-Aadhaar Linking | 31 मार्च 2023 नंतर तुमचं पॅनकार्ड निरुपयोगी होईल, हे काम लवकर पूर्ण करा, इतका दंड लागू

PAN-Aadhaar Linking

PAN-Aadhaar Linking | आधार कार्डप्रमाणेच देशातील नागरिकांसाठीही पॅनकार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. जर तुमच्याकडेही पॅन कार्ड असेल आणि तुम्ही ते अद्याप आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मार्च २०२२ मध्ये अधिसूचना काढून पॅन कार्डधारकांना आधार लिंक करावे लागेल, असे म्हटले होते. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. याचा अर्थ तुमच्याकडे फक्त चार महिने उरले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आधार पॅन कार्डशी जोडल्याबद्दल ३० जून २०२२ पासून 1,000 रुपये दंड निश्चित केला आहे. दंड भरल्याशिवाय पॅन कार्ड आधारशी लिंक करता येणार नाही. त्याचबरोबर जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात अपयशी ठरलात तर तुम्हाला ते वापरता येणार नाही.

आधार पॅन कार्डशी लिंक न केल्यास काय होईल
जर आधार पॅन कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाती, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येणार नाही आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय तुम्हाला पॅन कार्डचा दस्तऐवज म्हणून वापर करता येणार नाही. त्याचबरोबर वापर केल्यास तुम्हाला जबर दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272 बी अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

आयकर विभागाने दिली माहिती
पॅनशी आधार लिंक करण्याबाबत आयकर विभागाने ट्विटरवर माहिती दिली आहे. पॅनला आधारशी तात्काळ जोडलं जावं, असं आयकर विभागाने म्हटलं आहे. निष्क्रिय झाल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड वापरता येणार नाही.

पॅन कार्ड आधारशी कसे जोडावे
* सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
* आता तुम्हाला क्विक सेक्शनमध्ये जावं लागेल, इथे तुम्ही आधार लिंकवर क्लिक करा.
* नव्या विंडोवर आधार डिटेल्स, पॅन आणि मोबाइल नंबर टाका.
* ‘मी माझा आधार डिटेल्स व्हॅलिडेट करतो’ या पर्यायावर क्लिक करा.
* आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल, तो प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
* दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी जोडला जाईल

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PAN-Aadhaar Linking online process check details on 15 January 2023.

हॅशटॅग्स

#PAN Aadhaar Linking(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x