
IPO In Focus | ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून कमालीचा प्रतिसाद लाभला आहे. आता गुंतवणूकदार या IPO स्टॉकचे वाटप आणि लिस्टिंगची वाट पाहत आहेत. बीएसई निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहिती नुसार ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीच्या 33.97 कोटी रुपयांच्या IPO ला 243.70 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहेत. ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स या SME कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 287.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. DAIL Share Price
या शेअरची ग्रे मार्केट कामगिरी : DroneAcharya Aerial Innovations Share Price
या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. तथापि ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीच्या IPO शेअरची ग्रे मार्केटमध्ये किंमत प्रीमियम किमतीवर पोहचली आहे. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 69 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक मार्केट तज्ञांना हा स्टॉक जबरदस्त प्रीमियम किमतीवर लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे.
GMP म्हणजे काय ? : DroneAcharya Aerial Innovations Stock Price
शेअर बाजारातील तज्ञांनी ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 69 रुपये किमतीवर ट्रेड करत असल्याची माहिती दिली आहे. याचा अर्थ ग्रे मार्केटमधील तज्ञांना विश्वास आहे की या SME कंपनीचे शेअर जवळपास 123 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. याचा अर्थ हा स्टॉक लिस्टिंग च्या दिवशी 128 टक्के प्रॉफिट देईल. ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO मध्ये कमाल लॉट साइज 2000 शेअर्स आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराला या कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट साठी किमान 108,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. 23 डिसेंबर 2022 रोजी ड्रोनआचार्य एरियल इंनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.