30 May 2023 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lumax Industries Share Price | मालामाल शेअर! लुमॅक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 107 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, प्लस 270 टक्के डिव्हीडंड Penny Stocks | पाच स्वस्त पेनी शेअर्स! एका महिन्यात पैसा गुणाकारात वाढतोय, स्टॉक लिस्ट पहा Redmi Note 12T Pro | 64 MP कॅमेरा आणि 144Hz डिस्प्ले, Xiaomi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पहा Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे?
x

Sarkari Shares | होय! या सरकारी कंपन्यांच्या या दोन शेअर्सनी 15 दिवसात पैसे दुप्पट केले, स्टॉक नेम सेव्ह करा

Sarkari Shares

Sarkari Shares | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड ही खत निर्मिती करणारी सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 59 टक्क्यांची अद्भूत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक 9.99 टक्के कमजोरी सह 260.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 1 महिन्यात या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 130 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 316 रुपये होती. त्याच वेळी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 82.60 रुपये होती. ही सरकारी मालकीची कंपनी कॉम्प्लेक्स खते, सरळ खते, सेंद्रिय खते, जैव खते, आयातित खत, आणि बॅग्ड जिप्समचे उत्पादन करते.

15 दिवसात शेअर्समध्ये 105 टक्के वाढ :
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड कंपनीचे शेअर्सची किंमत मागील 15 ट्रेडिंग सेशनमध्ये 105 टक्क्यांनी वधारली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 144.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 295.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 9.99 टक्के पडझडीसह 260.30 रुपये किमतीवर बंद झाला आहे. जर तुम्ही 1 डिसेंबर 2022 रोजी फर्टिलायझर्स अँड कैमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.04 लाख रुपये झाले असते.

मद्रास फर्टिलायझर्सचा परतावा :
मागील 1 महिन्यात मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 80 टक्के वाढली आहे. 22 नोव्हेंबर 2022 रोजी या खत निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 46.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 83.75 रुपये किमतीवर बंद झाले होते. आज हा स्टॉक 9.97 टक्के घसरणीसह 75.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 5 दिवसात या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जवळपास 36 टक्के मजबूत झाले आहेत. त्याच वेळी 2022 या वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 188 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 83.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते, आणि आज या शेअर मध्ये 9.97 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. शेअर आज 75.40 रुपये किमतीवर बंद झाले आहे. . मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील एका वर्षात 210 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Shares Fertilizer and chemical Travancore and Madras Fertilizer share price in focus check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Shares(8)Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x