
Dwarikesh Sugar Share Price | सध्या जर तुमच्याकडे ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीचे शेअर्स असतील तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. साखर उत्पादन करणाऱ्या ‘द्वारिकेश शुगर’ कंपनी ने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के लाभांश वाटप करणार आहे. सलग दोन वर्ष कंपनीने गुंतवणुकदारांना अंतरिम लाभांश वाटप केलं आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 236 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने 150 टक्के परतावा दिला आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 85.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Dwarikesh Sugar Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
‘द्वारिकेश शुगर’ कंपनीच्या शेअरने मागील 15 वर्षात लोकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 226 टक्के नफा कमावला आहे. मागील 2 वर्षात या स्टॉकने लोकांना 150 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. मात्र मागील काही दिवसांच्या घसरणीने स्टॉक थोडा कमजोर झाला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 148 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर स्टॉक 42 टक्क्यांनी घसरून 85 रुपये आला होता. 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘द्वारिकेश शुगर’ या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार भांडवल 1607 कोटी रुपये आहे.
लाभांश रेकॉर्ड तारीख :
सेबीला दिलेल्या माहितीत ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीने सांगितले की, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 200 टक्के म्हणजेच 2 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने 31 मार्च 2023 हा दिवसा रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. नियमानुसार लाभांशाची रक्कम निर्दिष्ट कालावधीत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाईल. द्वारिकेश शुगर कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 2.40 टक्के आहे. याचा अर्थ जर तुम्ही कंपनीत 100 रुपये लावले तर तुम्हाला वार्षिक आधारावर 2.40 रुपये लाभांश मिळू शकतो.
सलग दुसऱ्या वर्षी लाभांश वाटप : ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड डेटच्या एक-दोन दिवस आधी एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करतील. जेव्हा एखादी कंपनी विशिष्ट तारखेला एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करते, तेव्हा त्या स्टॉकमध्ये लाभांश मूल्य जोडलेले नसते. शेअर धारक लाभांश देयक प्राप्त करण्यास पात्र आहेत की नाही, हे एक्स-डिव्हिडंड तारीख नुसार ठरते. कंपनीचा एकूण अंतरिम लाभांश खर्च 37.66 कोटी रुपये असेल. कंपनीने सलग दोन वर्ष अंतरिम लाभांश वाटप केलं आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने प्रति शेअर 2 रुपये लाभांश जाहीर केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.