
Ecoboard Share Price | इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 24.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
22 ऑगस्ट 2023 रोजी इकोबोर्ड इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार त्यांना नवीन कंत्राट मिळाले आहे. म्हणून या कंपनीच्या स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 25.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 24 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले आहे की, जे लहान मोठे काम मिळाले आहे, त्याचे एकूण मूल्य 24 कोटी रुपये आहे.
मागील एका महिन्यात इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी 3 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 29 टक्क्यांनी वाढले आहे. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.80 टक्के वाढले आहे.
गुंतवणूक करताना कंपनीची आर्थिक कामगिरी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जून 2023 तिमाहीत इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 3.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीने 17.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कमी होणाऱ्या महसुलामुळे इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्याच्या नफ्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत इकोबोर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला 3.2 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी या कंपनीने 5.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.