2 June 2023 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

Eicher Motors Share Price | मालामाल शेअर! गुंतवणूकदारांना 138 टक्के परतावा दिला, स्टॉक अजून तेजात येणार

Eicher Motors Share Price

Eicher Motors Share Price | ‘आयशर मोटर्स’ या बुलेट बाईक, आणि ट्रक बनवणाऱ्या वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरवर 37 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा लाभांश शेअर धारकांकडून मान्यता मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केला जाईल. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘आयशर मोटर्स’ कंपनीचे शेअर्स 5.86 टक्के वाढीसह 3,604.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च तिमाहीची कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत ‘आयशर मोटर्स’ कंपनीने 49 टक्क्यांच्या वाढीसह 906 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील मजबूत विक्रीमुळे कंपनीच्या नफ्यात ही जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत ‘आयशर मोटर्स’ कंपनीने 610 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

उत्पन्न तपशील :
‘आयशर मोटर्स’ कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न चौथ्या तिमाहीत वाढून 3,804 कोटी रुपयेवर पोहचले आहे. जानेवारी-मार्च 2022 मध्ये कंपनीचे ऑपरेटींग उत्पन्न 3,193 कोटी रुपये होते. आयशर मोटर्स कंपनीने पूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 2,914 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षी 1,677 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ‘आयशर मोटर्स’ कंपनीचे परिचालन उत्पन्न आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 10,298 कोटी रुपयांवरून वाढून 2022-23 मध्ये 14,442 कोटीवर पोहचले असल्याची माहिती कंपनीने तिमाही निकालात दिली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘आयशर मोटर्स’ कंपनीचे शेअर्स 5.86 टक्के वाढीसह 3,604.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘आयशर मोटर्स’ कंपनीने मागील एका वर्षाच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 48.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37.96 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 138.48 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Eicher Motors Share Price today on 12 May 2023

हॅशटॅग्स

#Eicher Motors Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x