
EPF Cash Balance | नोकरी करत असताना अनेक ठिकाणी पीएफ कट केला जातो. तर आता बऱ्याच ठिकाणी EPFO देखील कट केला जातो. आपल्या पगारातील कट होणारी ही रक्कम कंपनी सोडल्यावर अथवा कंपनीच्या नीयमाप्रमाणे आपल्याला मिळते. मात्र अनेकजण हे विसरून जातात की आपली किती टक्के रक्कम आता पर्यंत जमा झाली आहे. त्याची माहिती जाणून घेण्याच्या आधीची प्रोसेस अधिक वेळखाऊ होती. मात्र ही प्रोसेस आता खूप साधी आणि सोपी झाली आहे.
EPFO ची माहिती आता सर्व ऑनलाईन झाली झाली आहे. ती मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळ द्यावा लागेल. यात सर्व कारभार ऑनलाईन झाल्याने ही सेवा सर्व खातदारांसाठी सुलभ आहे. अगदी घर बसल्या तुम्ही ही माहिती मिळवू शकता.
EPFO ची माहिती ही चार प्रकारे मिळवा येते. यात तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल किंवा मॅसेज करावा लागतो. त्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या लिंक असलेल्या संपर्क क्रमांक मिळवते. यासाठी तुम्हाला कुठेही लॉग इन करायची देखील आवश्यकता नाही. तसेच पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये उमंग हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपच्या सहाय्याने तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच मिळवता येईल.
तुमच्या खात्याला जो क्रमांक रजिस्टर आहे त्यावरून :
011-22901406 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे ही माहिती येईल. यातून तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे समजेल. तसेच जर ही माहिती तुम्हाला मिस्ड कॉल न करता मिळवायची असेल तर त्याची देखील सुविधा आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबरवरून 7738299899 या नंबरवर एमएसएस करावे लागेल.
उदा. तुम्हाला EPFO UAN ENG / HIN 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला EPFO देखील एसएमएस मार्फत तुम्हाला तुमच्या खात्यातील जमा रकमेची माहिती देईल.
उमंग ॲप किंवा ईपीएफ पासबुक पोर्टलवर तुम्ही ही माहिती पाहू शकता. यात तुमचा पासवर्ड टाकून पुढे आलेली बेरीज वजाबाकी अचूक करावी. त्या नंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण पासबुक दिसेल. यामध्ये तुमच्या PF आणि EPFO ची सर्व माहिती तपशीलवार मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.