25 January 2025 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SBI Bank Gold Price | गोल्डन खुशखबर! SBI बँकेची स्वस्त सोनं योजना, बाजारभावा पेक्षा कमी किंमतीत, स्कीम डिटेल्स पहा

SBI Bank Gold Price

SBI Bank Gold Price | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तुम्हाला खास ऑफर मिळत आहे. 6 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार आहे. एसबीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 10 ग्रॅम सोनं किती मिळतंय ते आम्ही तुम्हाला सांगतो.

6 मोठे फायदे
१. तुम्हाला यात खात्रीशीर परताव्याची सुविधा मिळेल. सॉवरेन गोल्ड बाँडच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी २.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. हे व्याज सहामाही तत्त्वावर मिळणार आहे.
२. भांडवली नफा करातून दिलासा मिळणार आहे.
३. असे सोने जतन करण्याचा त्रास होत नाही.
४. कोणत्याही प्रकारचा जीएसटी आणि मेकिंग चार्जेस भरावे लागणार नाहीत.
५. SGB थेट तुमच्या डिमॅट अकाऊंटवर येईल.
६. कर्ज सुविधेसाठीही करता येईल वापर

10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे?
या योजनेअंतर्गत ६ ते १० मार्च या कालावधीत स्वस्त सोने मिळणार आहे. यासाठी इश्यू प्राइस 5,611 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आला आहे.

एसबीआयने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की सॉवरेन गोल्ड बाँडसह आपल्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि सुरक्षितता मिळवा. यासोबतच एसबीआयने सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पैसे का गुंतवावेत याची 6 कारणे दिली आहेत.

सॉवरेन गोल्ड बाँड कुठे खरेदी कराल?
पोस्ट ऑफिस, सर्व बँकांकडून, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (बीएसई) कडून सॉवरेन गोल्ड बाँडखरेदी केली जाऊ शकते.

मॅच्युरिटीनंतर किती वर्षांनी
सॉवरेन गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षांची असते. पण पाच वर्षांनंतर पुढील व्याज भरण्याच्या तारखेला तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकदाराने किमान एक ग्रॅम सोने गुंतवले पाहिजे. गरज पडल्यास गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बाँडवरही कर्ज घेऊ शकतो, पण गोल्ड बाँड गहाण ठेवावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Bank Gold Price Sovereign Gold Bond scheme check details on 05 March 2023.

हॅशटॅग्स

#SBI Bank Gold Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x