12 December 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

My EPF Money | नोकरदार EPF खातेधारकांना मिळणार 7 लाखांपर्यंतचा मोफत लाभ, माहिती नसल्यास कौटुंबिक नुकसान होईल

My EPF Money

My EPF Money | देशभरातील कोट्यवधी लोक संघटित क्षेत्रात काम करतात. या लोकांच्या पगारातील काही भाग पीएफच्या स्वरूपात कापून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खात्यात जमा केला जातो. ईपीएफओ खात्यात जमा झालेली रक्कम हा प्रत्येक पगारदार व्यक्तीचा मोठा आधार असतो, ज्याचा वापर तो वाईट काळात किंवा निवृत्तीनंतर करू शकतो. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदारांना पीएफ खात्यातून सर्व पैसे काढण्याची परवानगी मिळते. या खात्यात जमा झालेल्या पैशांची हमी सरकार देते. अशा परिस्थितीत ही पूर्णपणे जोखीममुक्त गुंतवणूक आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांना विमा सुविधा देण्यासाठी ईपीएफओ EDLI योजनेअंतर्गत खातेदारांना 7 लाख रुपयांचा संपूर्ण लाभ देते. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की EDLI योजना म्हणजे काय? EDLIचे पूर्ण रूप म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम. या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराला सात लाख रुपयांचा विमा मिळतो. आता आम्ही तुम्हाला या विम्याचा फायदा कोणाला मिळतो आणि त्याचा दावा कसा करता येईल हे सांगत आहोत.

काय आहे ईडीएलआय योजना आणि कोणाला मिळतो फायदा
एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत प्रत्येक पीएफ खातेधारकाला 7 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. जर एखाद्या पीएफ खातेधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंतविमा क्लेम मिळू शकतो. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराच्या 35 पट किंवा जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंत क्लेम मिळू शकतो. कायदेशीर वारस किंवा नामनिर्देशित व्यक्तीला या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार मिळतो. ईपीएफओ अनेकदा आपल्या खातेदारांना नॉमिनी अपडेट करण्याचा सल्ला देतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अपघाती मृत्यू झाल्यास कोणत्याही पीएफ खातेधारकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता यावी, हा या योजनेचा उद्देश आहे.

नॉमिनी असणं का गरजेचं आहे?
ईपीएफओ नेहमीच नॉमिनीला अपडेट करण्याचा सल्ला देतो जेणेकरून जर एखाद्या खातेदाराचा अचानक मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत पीएफ आणि ईडीएलआय योजनेत पडून असलेल्या पैशांवर दावा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय योजनांचे नॉमिनी सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात. नॉमिनी नसल्यास कायदेशीर वारसदाराला आधी वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तरच तो या पैशांवर दावा करू शकतो. या सगळ्या कामात खूप वेळ आणि त्रास होतो. अशावेळी नॉमिनीला अकाऊंटमध्ये नेहमी अपडेट ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My EPF Money EDLI scheme benefits check details on 05 March 2023.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x