20 May 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! फक्त बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटमुळे या शेअरने 1 लाखावर 12 कोटी परतावा

Titan Company Share Price

Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एका ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 2,521.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 14 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. तथापि, कंपनीने वेळोवेळी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभही दिला आहे. मागील 14 वर्षांत टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 40 वरून वाढून 2,510 पर्यंत वाढली आहे. 2011 नंतर ज्या लोकांनी टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना कंपनीने भरघोस लाभांश वाटप केले आहे. 2011 पूर्वी ज्या लोकांनी टायटन स्टॉक खरेदी केला होता, त्यांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरचा फायदा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

मागील एक वर्षापासून टायटन कंपनीचे शेअर्स बिल्डिंग मोडमध्ये आहेत. जुलै ते ऑक्टोबर 2022 या तिमाही कालावधीत टाटा उद्योग समूहाच्या शेअरने मजबूत कामगिरी केली आहे. शेअरमध्ये किंचित वाढ दिसली असली तरी टायटन स्टॉकमध्ये अस्थिरता अल्प मुदतीसाठी असते, अनिंत्याचा फारसा परिणाम गुंतवणुकीवर होत नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदाराच्या पैशांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट हिस्ट्री :
टायटन कंपनीच्या डेटानुसार, या टाटा ग्रुप कंपनीने 23 जून 2011 रोजी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. याचा अर्थ कंपनीने एक शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला होता. टायटन कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील केला होता, त्यात कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित केले होते.

बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा प्रभाव :
जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तुम्हाला 40 रुपये प्रति शेअर प्रमाणे 2,500 शेअर्स मिळाले असते. 1 : 1 बोनस शेअर वाटप केल्यानंतर तुमची शेअरहोल्डिंग दुप्पट होऊन 5000 शेअर्स झाली असती. नंतर टायटन कंपनीने 1 : 10 स्टॉक स्प्लिट केले, ज्यात तुमचे 5,000 शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजा झाल्यानंतर 50,000 शेअर्स झाले असते.

1 लाखावर 12 कोटी परतावा :
NSE वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार आज टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 2,521 रुपये आहे. जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून स्टॉक होल्ड केला असता तर तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 12.63 कोटी झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price 500114 stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

Titan Company Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x