
EPF Money | खासगी कंपनीत काम करताना कर्मचाऱ्यांना यूएएन क्रमांक मिळतो. ज्याद्वारे ते त्यांच्या ईपीएफओ खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. नोकरी बदलल्यावर तुमच्या जुन्या यूएएन नंबरच्या माध्यमातून नवीन अकाऊंट तयार केलं जातं. पण जुन्या कंपनीचा निधी त्यात जोडला जात नाही. त्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अकाउंटचं विलिनीकरण करू शकता. ज्यानंतर तुम्हाला सर्व निधी एकाच ठिकाणी दिसेल.
असे लॉग इन करा :
2 अकाउंट्सचं विलीनीकरण करण्यासाठी आधी ईपीएफओच्या वेबसाईटवर जावं लागेल. येथे आपल्याला सर्व्हिसेस पर्याय निवडावा लागेल आणि वन एम्प्लॉई- वन ईपीएफ अकाउंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडा असेल. येथे पीएफ खातेधारकाला आपला मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर यूएएन आणि सध्याचे मेंबर आयडी टाका.
ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण होईल :
सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तुम्ही यात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमचं जुनं पीएफ अकाऊंट दिसेल. आता पीएफ खाते क्रमांक भरा आणि घोषणापत्र स्वीकारून सबमिट करा. आता, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी, आपले खाते विलीन केले जाईल.
पीएफ शिल्लक ऑनलाइन तपासा :
बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login जाऊन यूएएन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करू शकता. कॅप्चा कोड भरा. आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, इथल्या ड्रॉप डाऊन मेन्यूमधून तुमचा यूएएन नंबर निवडा, तुम्हाला अकाउंट बॅलन्स दाखवला जाईल.
रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे तपासा :
ईपीएफओ अकाउंटमधील तुमच्या रजिस्टर्ड नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती सहज मिळू शकते. ‘ईपीएफओ’तर्फे मिस्ड कॉल सेवाही चालवली जाते, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरच अकाउंट बॅलन्सची माहिती मिळेल. यासाठी ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर आपल्या रजिस्टर्ड क्रमांकावरून मिस्ड कॉल करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.