
EPFO KYC | भारत सरकारने पीएफ खात्याची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यात तुम्हाला तुमचे पीएफ खाते आधारकार्ड बरोबरच अन्य ठिकाणी लिंक करणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या अभावी अनेकांना बॅंकेत जाउन हे करणे शक्य होत नाही. त्यामुळे इपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा देखील ऑनलाईन केली आहे. यामुळे तुम्हाला कधीही आणि कुठेही तुमचे पीएफ खाते लिंक करता येऊ शकते.
याचे फायदे नेमके कोणते
ईपीएफ खाते केवायसी लिंक आणी अपडेट करणे तुमच्या खुप फायद्याचे आहे. यात तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. तसेच या खात्यावर ऑनलाइन व्यवहार करता येऊ शकतात. जर तुम्ही केवायसी अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येतील. यात ऑनलाईन ट्रांजेक्शन आणि पैसे काढणे या सेवा तुमच्यासाठी बंद होतील.
या पध्दतीने पीएफ खात्याचे केवायसी करा अपडेट
* ईपीएफओच्या https://unifiedportalmem.epfinadia.gov.in/memberinterface या वेबसाईटला भेट द्या.
* तुमचा १२ अंकी युएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा ही माहिती टाकून ल़ॉगइन करा.
* यात लॉगिन झाल्यावर समोर आलेल्या पेजमध्ये वरती हिरव्या रंगात मॅनेज लिहिलेले असेल.
* त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला केवायसीचा पर्याय दिसेल.
* केवायसीवर तुम्हाला एक नविन पेज मिळेल. त्यातील चेक बॉक्सवर क्लिक करा.
* यात तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांची माहिती भरा.
* सर्व माहिती भरुन झाल्यावर खाली सेव बटणावर क्लिक करा.
* या नंतर पीएफ खात्याचे केवायसी अपडेट होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.